रम्मी...
« on: April 02, 2022, 03:22:20 AM »
प्रिय मित्रांनो,
ऑनलाईन रम्मी खेळून बरेच लोक आर्थिक समस्यांना तोंड देत आहेत. त्यांना जागृत करण्यासाठी माझा छोटासा प्रयत्न मी या माझ्या पहिल्याच कवितेतून करत आहे.


इवलसं संसार माझा
स्वप्न होते मोठे मोठे...
पटकन कसा श्रीमंत होऊ ही गोष्ट मनी खूप नाचे,
मार्ग सापडला पैसे कमवायचा, आता मात्र मोबाईलवर पत्ते खेळायचा.

इवलसं संसार माझा
स्वप्न होते मोठे मोठे...
पैसे आले आणि गेले
पुन्हा टाकले आणि पुन्हा गेले
थांबलो नाही एवढ्यावर पी एफ काढले आणि तेही गेले.

इवलसं संसार माझा
स्वप्न होते मोठे मोठे...
आशा होती गेलेले पैसे परत मिळवायचा
मग मी मनी ध्यास धरला कर्ज काढायचा
कर्ज मिळाला, आभार त्या जामीनदाराचा

इवलसं संसार माझा
स्वप्न होते मोठे मोठे...
बचत संपली, पीएफ गेला, कर्जाचे हफ्ते फेडत राहिलो.
भाजीवाल्याशी बायकोला पाच रुपयासाठी भांडताना मी मात्र बघत राहिलो.
डोळे आले भरून अरे मी काय करून राहिलो?

इवलसं संसार माझा
स्वप्न होते मोठे मोठे...
झाला फार पश्चाताप, नुकसान झाला अमाप
आयुष्यातील बरीच वर्षे वाया गेली कोणाला देऊ शाप
मरून जाऊन प्रॉब्लेम काही होणार नाहीत स्टॉप

इवलसं संसार माझा
स्वप्न होते मोठे मोठे...
कामावरून घरी येताच लेकरू मला मिठी मारते
कामावरून घरी येताच बायको माझे पाय चेपते
मी त्यांचा विश्वासघात केला हे त्यांना कसे कळते?

इवलसं संसार माझा
स्वप्न होते मोठे मोठे...
नंतर आले लक्ष्यात की ते मार्ग होते खोटे खोटे
पुन्हा उभा करू संसार बचत करून छोटे छोटे
या जगात काही मिळते का हो फुकट कधी कुठे?

इवलसं संसार माझा
स्वप्न आहेत मोठे मोठे...
शून्यापासून सुरुवात करू ताकत अजून संपली कुठे?
एक ना एक दिवस कर्ज माझे सारे फिटे
करूया नवीन सुरवात बचत करून छोटे छोटे.

इवलसं संसार माझा
स्वप्न आहेत मोठे मोठे...
जगायचं आहे मला माझ्या बायको आणि लेकरांसाठी
जगायचं आहे मला माझ्या आई आणि बाबांसाठी
जगायचं आहे मला माझ्या कुटुंबाला आधार देण्यासाठी.

इवलसं संसार माझा
स्वप्न आहेत मोठे मोठे...
गेले ते दिवस, विसरू त्या आठवणी
पुन्हा "त्या" नादी लागणार नाही ठरवू हे मनी
कष्टाच्या कमाई विना काही नसते या जीवनी.

इवलसं संसार माझा
स्वप्न आहेत मोठे मोठे...
सध्याच्या कमाईने मी उपाशी आहे कुठे?
योग्य नियोजनामुळे प्रॉब्लेम सारे मिटे.
घरी बसून पैसा मिळवता येते ही गोष्ट आहे खोटे.

इवलसं संसार माझा
स्वप्न आहेत मोठे मोठे...
स्वप्न आहेत मोठे मोठे...

जे शिवकुमार ✍️