Chota Kavi

फेसबुक
« on: July 16, 2012, 06:55:17 PM »
फेस बुक फेसबुक म्हणजे एक फालतू टाइम पास असत
बाकी तुमच आमच प्रोफाईल सार काही सेम असत || ध्रुव.||

आज मी कोणती कविता (चोरून} टाकू ??
आज ती कोणत्या स्टेटस ला लाईक देईल |
हा विचार करण्यात निघून जातो कौलेज चा पहिला तास
मनी खंत राहते ती खरच मानते मला खास कि जस्ट अ टाइम पास ||१||

आता बाहेर जाताना आम्ही कॅमेरा न्यायला विसरत नाही
जिथे तिथे फोटोला {फालतू} पोझ देताना आम्ही घाबरत नाही |
बाहेरून आल्यावर हात पाय धुवावेत हि "संस्कृती" आम्ही बाळगत नाही
आल्या आल्या "फेसबुक" ला कवटाळल्या शिवाय आम्हास राहवत नाही ||२||

आता तर "फेसबुक" चा लागलाय एवढा ध्यास
त्याज शिवाय मनी नाही कोणतीच आस |
या पासून काय मिळाले हे कळले नाही अजूनही मनास
लवकर सुटो हे "व्यसन "हि प्रार्थना करतो देवास ||३||

simran254

Re: फेसबुक
« Reply #1 on: June 21, 2022, 10:54:31 AM »
 मराठी कविता, Marathi Kavita,