Manasi

Marathi ukhane navardevasathi
« on: July 22, 2010, 11:06:40 PM »


काही शब्द येतात ओठातून
काही येतात गळ्यातून
राणी चं नाव येतं मात्र थेट हृदयातून


कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास
मि देतो ...... ला श्रिखद चा घास


भाजित भाजि पालक,
...माझि मालकिन अन् मि मालक !





भाजीत भाजी मेथीची,

......माझ्या प्रितीची.


पुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक,
.... आहेत आमचे फार नाजुक.



लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम,
....ची माझ्या र्हुदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.


संतांच्या वाणीत आहे 'सोनियांच्या (ज्ञानाच्या) खाणी',
.... आहेत माझे कुंकूवाचे धनी


ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेने डोळे दिपले जगाचे,
...सहसंसारात सुखी होण्यासाठी मागणे आहे तुमच्या आशीर्वादाचे.

गोरया गोरया हातावर रेखाटली मी सुबक मेंदी,
....चे नाव घेण्याची वारंवार येवो संधी

================

 गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट
----- नाव घेते सोडा माझी वाट

   
हिमालय पर्वतावर बर्फाचे खडे
....... चे नाव घेते सत्यनारायणापुढे



आई बापाने वाढवले मैत्रिणीने घडवले
--- चं नाव घ्यायला --- अडवले

   
हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात
---- बसले दारात मी जाऊ कशी घरात


 रातराणीच्या सुगंधाने नीशिगंध झाला मोहित
मागते आयु्ष्य ----- च्या सहीत


संथ संथ वाहे वारा मंद मंद चाले गती
देवा सुखी ठेव ------- ची जोडी

   
साठ्यानंची बीस्कीटे, बेडेकरंचा मसाला
--- नाव घ्यायला आग्रह कशाला


 कुंकु लावत ठसठशीत, ह्ळ्द लावते किंचित,
..... आहेत माझे पूर्व संचित

लागलाय श्रावण कर्ते मी महादेवाची महोभावे पुजा,
.... च्या जीवावर कर्ते मी मजा.


   
 सासर्याच्या मांडवात पंचपक्वांनाच्या राशी,
पोट्टे पाट्टे जेवुन गेले, जावई राहीला उपाशी.
   
दुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक,
ताकाचा केला मठ्ठा, ...... चे नाव घेतो ..... रावान् चा पठ्ठा

भाऊबहिणीच्या प्रेमाचे प्रतिक आहे रक्षाबंधन,
....ना करीते मी रोजच वंदन.

   
तडजोड हा मंत्र आहे दोन पिढ्यांना जोडणारा पूल
...ना आवडते गावठी गुलाबाचे फुल


हिरवा शालू लेवुनि येतो श्रावण महिना,
.... हाच माझा खरा दगिना.


=श्रावण महिन्यात सर्वजण करतात श्रवणी सोमवार,
.... सह केले मी हरिद्वार किंवा आहेत दिलदार.

झुळुझुळु वाहे वारा मंद मंद चाले होडी
आयुष्यभर सोबत राहो --- - --- ची जोडी


पुण्यात औन्ध मधे बन्गला उभा आहे ऐटित
जलु नका लोकहो ... राव आहे आय़् टीत



अत्रावळ पत्रावळ , पत्रावळीवर होती वान्ग्याची फोड
***** हसतात गोड, पण डोळे वटारायची भारीच खोड्


सखोल विचार आणि कठीण परीश्रमाला असावी प्रामाणिकपणाची जोड
...चे बोलणे आहे साखरेपेक्षा गोड

कपाळावर लावले कूंकू लाल लाल,
.... च्या जीवावर आहे मालीमाल


भारतीय नारी पतिला देते उच्च स्थान,
...... चे ठेवीन सदोदित मान.


थोरातांच्या दुधावर येते जाड साय,
....... ना जन्म देणरी धन्य ती माय


फुलासंगे मातीस सुवास लागे,
.... नि माझे जन्मोजन्मिचे धागे.


मुर्तीकाराने घडवली सुंदर मुर्ती ,
विलासरावांची वाढो सर्वदूर किर्ती


ग.दी. माडगुळकरांचे रामायण सुधीर फडक्यांनी गायिले
सुरेशरावां करिता मी पुणे पाहीले


चंदनासारखे झिजून करावी सर्वांची सेवा ,
...म्हणतात करु नको कधी दुसर्याचा हेवा


मानवाने करु नये कुणाचा हेवा ,
प्रकाशराव म्हणतात करावी सर्वांची निस्वार्थाने सेवा


घराच्या पुढे अंगण अंगणात सजलाय बोगनवेल ,
प्रवेश करते गृहलक्ष्मी , वाजवून ...च्या घराची बेल


रुसलेल्या ज्योतीला पवन म्हणतो हास,
------ ना भरवते मी श्रीखण्ड-पुरीचा घास


मंथरेमूळे घडले रामायण,
..... चे नाव घेते आज आहे सत्यनारायण


सुहासिनीने करावे नेहमी सोळा श्रूंगार,
.......आहे माझे प्रेमळ भरतार


जीवन आहे एक अनमोल ठेवा,
...... आणतात नेहमी सुकामेवा.


अजिंठा-वेरुळ्ची जगप्रसिद्ध आहे कोरीव लेणी,
..... नी आणलीये सुगंधी वेणी.



गीत गोविंदात श्रीकृष्णाने खेळीला राधेशी रास,
.... चे नाव घेते सुनमुख प्रसंगी सासुबाई पुढे घातली धान्याची रास



माझ्या धान्याचे माप आज शिगोशीग भरले,
म्हणून ........ रावांची मी सॉभाग्यवती झाले



ओssम या शब्दात आहे दिव्य शक्ती ,
...रावांवर करते मी अमर प्रीती


दैन्ंदिन जीवनात सुद्धा भगवतगीतेला आहे महत्त्व
रामरावांसह मी करीन काहीतरी दिव्यत्त्व


गृहप्रवेश करतांना साठविले मायेचे मोती भरभर,
..... च्या हातात हात देउन झाले मी निर्भर


विवाह म्हणजे सुरुवात एका नव-जीवनाची,
..... चे नाव घेउन जाणीव ठेवीन स्त्री कर्तव्याची



उखाणा घेउन भगिनिंच्या सुप्तगुणांना मिळतो वाव,
आज आहे मंगळागॉरी ..... चे घेते मी नाव.



जाऊनिया काश्मिरला साजरे केले हनिमुन,
... चे नाव घेते .... ची सुन.



सौभाग्याचे काळे मणी घातले गळा,....नी लावला गुलाबांचा मळा,
किंवा .....च्या नावाने लावीते कपाळी लाल टीळा



देवब्राम्हण अग्नीसाक्षीने घेतले मी सात फेरे,
.... चे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे


दोन जीवांचे मीलन जणु शतजन्माच्या गाठी,
.....चे नाव घेते / घेतो तुमच्या आग्रहासाठी


अंगावरच्या शेलारीला बांधुनी त्यांचा शेला,
....चे नाव घेण्यास आज शुभारंभ केला


फुलले गुलाब गाली, स्पर्शात (डोळ्यात) धुंद झाली प्रीती,
....ची झाले मी जन्मोजन्मीची सौभाग्यवती


शब्दावाचुनी कळले सारे शब्दांच्याही पलीकडले,
....च्या प्राप्तीने मम भाग्य उदयाला आले


मनोकामना झाल्या सफल, आकांक्षांची होईल पूर्ती,
....रावांना मिळो तुमच्या आशीर्वादाने कीर्ती


संकेताच्या मीलनाकरीता नयन माझे आतुरले,
....ची मी आज सौभाग्यवती झाले


वर्षाकाठचे महिने बारा,
....या नावात सामवलाय आनंद सारा.


एक तीळ सातजण खाई,
.....ना जन्म देणारी धन्य ती आई.

marathiadmin

Re: Marathi ukhane navardevasathi
« Reply #1 on: April 18, 2011, 04:30:37 PM »
Mast !!
मी मराठी

simran254

Re: Marathi ukhane navardevasathi
« Reply #2 on: June 21, 2022, 12:42:22 PM »
 Marathi Ukhane,  मराठी उखाणे, मराठी उखाणे  वरांसाठी, मराठी उखाणे नवरादेवासाठी, Marathi Ukhane for Groom,मराठी उखाणे,