Harishnaitam

आता तरी होशील का माझी...
तुला राणी माझी बनवीन

एकांतात शांत बसला असतान
तुझी प्रतीमा आली डोळ्या समोरून
तुझ्यात मी सारं गेलो हरवून
स्वतःला सारं बसलो विसरून ||

तुझे नी माझे दोन मन मिळून
एकच विचार सदा घडवून
शब्दांचा खेळ सारा रंगवून
शब्द मनात जातात खोलवर रूजून ||

तुझ्या आठवणीने सार मन जातं फुलून
कधी हसवून तर कधी जात हरवून
तुझ्या गजऱ्याचा सुगंध जातो दरवळून
राणी तुझ रूप दिसत फुलून ||

तुझ्या एका भेटीसाठी आतूर मि होईन
ही एक भेट गाठ यावी घडून
तुझे ते रूप गोजिरे डोळे भरून पाहिन
तुझ्या भेटीचे ते सारे क्षण ठेवीन साठवून  ||
   
      कवी:- हरिष नैताम

marathiadmin

Re: आता तरी होशील का माझी...
« Reply #1 on: August 20, 2021, 06:02:53 PM »
Chaan Harish !!
मी मराठी