Chota Kavi

यालाच म्हणतात का प्रेम....?

तिच्या आठवनींची वाढत जाणारी नशा,
आणि फक्त तिच्या अस्तित्वानेच खुलनारी प्रत्येक दिशा,
यालाच म्हणतात का प्रेम....?
तिची क्षणोक्षणी कासावीस करणारी चाहुल,
आणि हलुवार मला तिची आठवण करून देणार तीच पैजनाने सजलेल पाउल,
यालाच म्हणतात का प्रेम....?
तिचा मी अनुभवलेला बेधुंद श्वास,
आणि तिने वेड्या गप रे म्हणाव असा मलाप्रत्येक क्षणी होणारा भास,
यालाच म्हणतात का प्रेम....?
तिच्या आठवणीने माझा कासाविस होणारा जीव,
आणि सर्वापेक्षा जास्त प्रेम करूनही तिला न येणारी माझी किव,
यालाच म्हणतात का प्रेम....?
तिला जाणीव पण न होता माझ्या प्रेमाचाझालेला तिला स्पर्श,
आणि हे सर्व वाचून,
तिच्या नाजुक ओठावर आलेल्या हास्याचावेड्या अक्षयला झालेला हर्ष,
कदाचीत यालाच म्हणत असतील प्रेम....!"

Chutaki

Re: यालाच म्हणतात का प्रेम....?
« Reply #1 on: October 05, 2016, 07:13:27 PM »
प्रेम हे खरच असच असतं ना, ज्याचा अनुभवही कुणाला सांगता येत नाही. Its an amazing.
(*$*)

simran254

Re: यालाच म्हणतात का प्रेम....?
« Reply #2 on: June 26, 2022, 12:24:48 PM »
एक हृदयस्पर्शी प्रेमकथा,Marathi Love story,Marathi Katha,प्रेमकथा,